केरळ राज्य लॉटऱ्या

केरळ राज्य लॉटरी केरळ सरकारद्वारा चालवली जाते व ती 1967 मध्ये अर्थमंत्री श्री. पी. के. कुंजू साहेबांद्वारा स्थापित झाली. केरळ राज्य लॉटरी भारतातील अशा प्रकारची पहिलीच होती, जिने खेळाडूंना सात साप्ताहिक लॉटऱ्या व सहा बंपर लॉटऱ्या देऊ केल्या.

सुरू झाल्यापासून, या प्रसिद्ध राज्य लॉटऱ्यांनी अनेक खेळाडूंना लक्षाधीश केले, ज्यात लखमीपूरच्या मोहिजूल रहिमा शेखचा समावेश होतो जो 7 मार्च 2016 रोजी रु. 1 कोटी जिंकून बातम्यांचा मथळा बनला.


साप्ताहिक लॉटऱ्या

साप्ताहिक सोडती भारतीय प्रमाण वेळ 15.30 वाजता होतात. तिकिटांचे मूल्य रु. 30 - रु. 50 दरम्यान असते व प्रत्येक लॉटरीची स्वतःची बक्षीस रचना असते.

हे टेबल केरळ साप्ताहिक लॉटऱ्यांची यादी, तिकिटांचे मूल्य, सोडतीचे दिवस व पहिल्या बक्षिसाची रक्कम दर्शवते:

सोडतीचा दिवस लॉटरीचे नाव तिकिटांचे मूल्य (रु) पहिल्या बक्षिसाची रक्कम (रु)
सोमवार विन-विन 30 65 लाख
मंगळवार धनश्री 40 65 लाख
बुधवार अक्षया 30 65 लाख
गुरूवार कारुण्य प्लस 50 1 कोटी
शुक्रवार भाग्यनिधी 30 65 लाख
शनिवार कारुण्य 50 1 कोटी
रविवार पौर्णमी 30 65 लाख

बंपर लॉटऱ्या

बंपर लॉटऱ्यांच्या सोडती वर्षभर वेगवेगळ्या वेळी होतात. बंपर लॉटऱ्यांच्या तिकिटांचे मूल्य रु. 100 पासून रु. 200 पर्यंत असते व खेळाडू रु. 10 कोटीपर्यंत बक्षिस रक्कम जिंकू शकतात.

लॉटऱ्या व सोडती होतात ते महिने खालीलप्रमाणे आहेत:

सोडतीचा महिना बंपर लॉटऱ्या
जानेवारी क्रिसमस- न्यूइअर
मार्च समर
मे विष्णू
जुलै मॉन्सून
सप्टेंबर थिरुवोनम
नोव्हेंबर पूजा

केरळ राज्य लॉटरी एफएक्यूज

  1. 1. केरळ लॉटरी तिकिटे मला कोठे खरेदी करता येतील?
  2. 2. केरळ लॉटरीचे ताजे निकाल मला कोठे मिळतील?
  3. 3. केरळ लॉटरीची सोडत मला कोठे पाहता येईल?
  4. 4. मी बक्षिस जिंकले आहे का ते मला कसे शोधता येईल?
  1. 5. केरळ लॉटरीच्या बक्षिसावर मी कसा क्लेम करू शकेन?
  2. 6. बक्षिसावर मी किती दिवसांमध्ये क्लेम केला पाहिजे?
  3. 7. केरळ लॉटरीच्या बक्षिसांवर मला कर भरावा लागेल का?

उत्तरे


1. केरळ लॉटरी तिकिटे मला कोठे खरेदी करता येतील?

खेळाडू 35,000 हून अधिक नोंदणीकृत लॉटरी एजंट व 100,000 हून अधिक रीटेलर यांच्याकडून तिकिटे खरेदी करू शकतात. अधिक माहितीसाठी व जवळचा एजंट शोधण्यासाठी आपण आपल्या जिल्हा लॉटरी कार्यालयाशी संपर्क साधा.

To Top

2. केरळ लॉटरीचे ताजे निकाल मला कोठे मिळतील?

केरळ लॉटरीचे निकाल प्रत्येक सोडत निघाल्यानंतर त्याच दिवशी प्रकाशित होतात. निकाल अनेक प्रमुख दैनिकांमध्ये प्रकाशित होतात व तिकिटे खरेदी केलेल्या लॉटरी एजंटांकडेही उपलब्ध असतात. अधिक माहितीसाठी खेळाडूंनी त्यांच्या स्थानिक लॉटरी एजंट किंवा जिल्हा लॉटरी कार्यालयाकडे तपास करावा असा सल्ला देण्यात येत आहे.

To Top

3. केरळ लॉटरीची सोडत मला कोठे पाहता येईल?

सोडती केरळ राज्याच्या विविध ठिकाणी होतात व प्रत्येक ठिकाणी जनतेला सोडती बघण्यासाठी आमंत्रित केले जाते. ठिकाणांबाबत माहिती स्थानिक लॉटरी एजंट व मीडियाद्वारा उपलब्ध असते.

To Top

4. मी बक्षिस जिंकले आहे का ते मला कसे शोधता येईल?

आपले तिकिट जवळच्या लॉटरी एजंट वा रीटेलरकडे घेऊन जा व तुम्ही बक्षिस जिंकले आहे का याची पुष्टी ते करू शकतील. विजेत्या लॉटरी तिकिटावर मिळणाऱ्या बक्षिस रकमांचीही पुष्टी ते करू शकतील.

To Top

5. केरळ लॉटरीच्या बक्षिसावर मी कसा क्लेम करू शकेन?

रु. 1 लाखापर्यंतची बक्षिसे जिल्हा लॉटरी कार्यालयात रिडीम करता येतात. रु. 1 लाखावरील जिंकलेली बक्षिसे तिरुअनंतपूरम येथील जिल्हा लॉटरी संचालकांच्या कार्यालयात क्लेम करावी लागतात.

To Top

6. बक्षिसावर मी किती दिवसांमध्ये क्लेम केला पाहिजे?

जिंकलेल्या रकमा सोडतीच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत क्लेम केली पाहिजेत व तिकिटधारकाने क्लेम अर्ज फॉर्म, दोन पासपोर्ट फोटो व बक्षिस रकमेची पावती असे दस्तावेज सादर केले पाहिजेत. अन्य कोणी खेळाडूंच्या वतीने बक्षिस क्लेम करू नये म्हणून आपल्या तिकिटाच्या मागे सही करून आपला पत्ता लिहिण्याचा सल्लाही खेळाडूंना देण्यात येत आहे.

To Top

7. केरळ लॉटरीच्या बक्षिसांवर मला कर भरावा लागेल का?

रु. 10,000 वरील सर्व जिंकलेल्या बक्षिसांवर 30% आयकर कापला जाईल. एजंटांनी केलेल्या दाव्यांवरही 10% दराने आयकर लागू होतो. अधिक माहितीसाठी खेळाडूंनी जिल्हा लॉटरी कार्यालयाकडे संपर्क साधावा असा सल्ला देण्यात येत आहे.

To Top